Top News

मुंबईतील वीजपुरवठा खंडित का झाला, तांत्रिक बिघाडाची चौकशी करणार- नितीन राऊत

मुंबई | मुंबईसह इतर भागातील वीजपुरवठा एकाचवेळी खंडित झाल्याने सध्या गोंधळाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजपुरवठा तासाभरात पूर्ववत करण्याचे आश्वासन दिलंय.

वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर तांत्रिक बिघाड का झाला, याची चौकशी करणार असल्याचंही नितीन राऊत यांनी सांगितलं. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

दरम्यान, सध्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने तिन्ही मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली आहे. तसेच इंटरनेटही बंद झाल्याने मुंबई-ठाण्यातील कामं ठप्प झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

मराठा आरक्षण स्थगितीचा पहिला फटका, 35 हजार मुलं राहणार प्रवेशापासून वंचित?

‘थंडीत कोरोना वाढू शकतो’; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

“राहुल आणि प्रियंका गांधी यांनी पानांवरुन पीक कोणतं हे ओळखल्यास मी राजकारण सोडेन”

“आरे कारशेड कांजूरमार्गला हलवणं म्हणजे बालहट्ट पुरवण्याचा प्रकार”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या