नागपूर महाराष्ट्र

“विरोधी पक्षाकडून महाराष्ट्राची प्रगती रोखण्याचा प्रयत्न”

नागपूर | महाराष्ट्राच्या प्रगतीला रोख लावण्याचं काम विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे, ते योग्य नाही, अशी टीका ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली आहे.

राज्यामध्ये 24 तास वीज पुरवठा करणं आमचं काम आहे. त्यानुसार वीज वापरली असेल तर ते भरणे ग्राहकांचं काम आहे. तसं झालं तर आम्हीही 24 तास वीज पुरवठा करतोय. आम्ही वीज कनेक्शन कापणार नाही, असं नितीन राऊत यांनी सांगितलं आहे.

लॉकडाऊन काळात ग्राहकांना देण्यात आलेली 69 टक्के वीजबिल भरली आहेत. वीज बिल माफीची मागणी करणारे नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही वीज बिलं भरलं आहे, असंही नितीन राऊत म्हणाले.

दरम्यान, भविष्यात महावितरणच्या वीज बिलातील त्रुटी दूर करण्यासाठी महावितरण लवकरच पोस्टपेड आणि प्रीपेड मिटर देणार आहोत. प्रीपेड-पोस्टपेड मोबाईलप्रमाणेच हे स्मार्ट वीज मीटर काम करणार आहे, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या-

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णव गोस्वामींना दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला झापलं!

‘कंगणाविरोधातील कारवाई सूडबुद्धीने’; उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारलं

स्मिथ आणि फिंचची दमदार शतकं; ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर 375 धावांचं खडतर आव्हान

प्रताप सरनाईक प्रकरणासंदर्भात ईडीने केला मोठा खुलासा

राज्यातील सध्याचे सरकार लवकरच कोसळेल कारण…-राम शिंदे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या