महाराष्ट्र मुंबई

‘हम ईट का जवाब पत्थर से देना जानते है’; काँग्रेसच्या राऊतांचा शिवसेनेला इशारा

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे महाविकासाघाडीमध्ये शाब्दिक वाद सुरू झाले आहेत. मंत्री अशोक चव्हाण यांच्यापाठोपाठ आता नितीन राऊत यांनीही शिवसेनेला इशारा दिलं आहे. यावर काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

‘हम ईट का जवाब पत्थर से देना जानते है’, असा इशारा नितीन राऊत यांनी शिवसेनेला दिला आहे. तसेच इंदिरा गांधी आमच्यासाठी पूजनीय आहेत. त्यांच्याबाबत कोणी काहीही बोललं तर खपवून घेणार नाही, असं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

अशोक चव्हाण यांनी याआधी त्यांच्या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ पोस्ट करून संजय राऊत यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी संजय राऊत यांनी चुकीची वक्तव्य केली आहेत.  त्याविषयी शंका घ्यायला देखील वाव नाही. एक कर्तबगार नेत्या म्हणून संपूर्ण जगामध्ये त्यांच्याबद्दल मोठा आदर आहे. त्यामुळे त्यांच्या बद्दल चुकीची वक्तव्य करणं अयोग्य आहे, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, माझ्या वक्तव्यामुळे इंदिरा गांधींच्या प्रतिमेला ठेच पोहोचली असं कोणाला वाटत असेल आणि माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझं वक्तव्य मागे घेतो, असं म्हणत संजय राऊत यांनी मागार घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या