महाराष्ट्र मुंबई

“उन्नाव पीडितेला एअरलिफ्ट करून मुंबईत पाठवा, आम्ही तिला उत्तम उपचार देऊ”

Photo Credit- Facebook/ Nitin Raut

मुंबई | उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यामध्ये तीन अल्पवयीन मुली शेतात ओढणीला बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. यातील दोन मुलींचा मृत्यू त्याच तिथेच झाला असून एकीची मृत्यूशी झुंज सुरू आहे. याप्रकरणावर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नितीन राऊत यांनी देखील उन्नावमधील मुलीला मुंबईत उपचार करण्यासाठी एअरलिफ्ट करावं, अशी विनंती उत्तर प्रदेश सरकारला केली आहे.

आम्ही उन्नाव पीडितेला उत्तम वैद्यकीय उपचार देऊ आणि राज्य सरकार उपचाराचा सर्व खर्च उचलेल. देशातील सर्वोत्तम रुग्णालयांपैकी काही रुग्णालये मुंबईत आहेत. हे लक्षात घेता मुलीवर मुंबई उपचार झाले तर ते अधिक योग्य होईल, असं ट्विट नितीन राऊतांनी केलं आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. याप्रकरणीतील एक मुलगी जिवंत असून तिच्यावर उत्तम उपचार करून तिला वाचवण्याची मागणी होऊ लागली आहे.

थोडक्यात बातम्या-

पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

“आराेप सिद्ध हाेईपर्यंत संजय राठाेड यांच्यावर कारवाई नको”

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार यांना दिलासा!

होम क्‍वारंटाइन रुग्णांच्या हातावर पुन्हा शिक्का, घराबाहेर पडल्यास होणार ‘ही’ कारवाई

“काँग्रेसनं संविधान सांभाळलं म्हणून चहावाला देशाचा पंतप्रधान झाला”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या