Top News पुणे महाराष्ट्र

“नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाच्या गादीवर बसवून भांडवलदार राज्य करत आहेत”

पुणे | राजेशाहीच्या काळात एखाद्या वारसाला वा दत्तकाला गादीवर बसवून राज्य कारभार चालवला जायचा. तसेच सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाच्या गादीवर बसवून भांडवलदार राज्य करत असल्याचं काँग्रेस नेते आणि राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत म्हटलं आहे. पुण्यात काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

व्यापाऱ्यांनी आणि भांडवलदारांनी 200 वर्षांपूर्वी पेशवाईचा पराभव केला. हे लक्षात ठेवून ही नवी पेशवाई भांडवलदारांशी जिगरी मैत्री करतेय. त्यांच्या मांडीवर बसून देशावर राज्य करत आहे, असं नितीन राऊत यांनी सांगितलं.

समतेसाठी आणि आपल्या हक्कासाठी लढणारे विचारवंत, बुद्धिजीवी, कामगार आणि शेतकरी यांना अतिरेकी किंवा नक्षलवादी म्हणून छळ, हेटाळणी संघ आणि भाजप करत असल्याचा आरोपही राऊतांनी केला.

दरम्यान, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी समतेची व समाज परिवर्तनाची लढाई अहिंसक पद्धतीने लढणे हीच भीमा कोरेगाव शहिदांना खरी श्रद्धांजली असल्याचं राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“अजितदादा, एक तर तुम्ही माझ्या घरी या किंवा मी तुमच्या घरी येतो”

लता मंगेशकर यांचं ठाकरे कुटुंबाला उद्देशून ट्विट; ट्विटमध्ये म्हणतात…

सोनमची कपूरची बातच न्यारी! हटके अंदाजात दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा

#Video | धारावीत घरात शिरलेल्या अजगराला पोलिसानं स्वत:च्या हातानं धरुन बाहेर काढलं

“मुख्यमंत्री साहेब सरकार इतकं निर्दयी कसं काय झालं?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या