Top News महाराष्ट्र मुंबई

“केंद्र सरकार आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये गडकरींनी मध्यस्थी करावी”

नागपूर | राजधानीमध्ये चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता एक महिना लोटला आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये अनेक बैठका झाल्या मात्र अद्यापही कोणताही तोडगा निघाला नाही. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्याने गडकरींना मध्यस्थी करावी असं म्हटलं आहे.

दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनात केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी मध्यस्थी करावी, अशी मागणी ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली आहे.

नागपूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाचं उद्घाटन कार्यक्रमात ऊर्जामंत्री नितीन राऊत बोलत होते. या प्रादेशिक परिवहन कार्यालयाचं नितीन गडकरींच्या हस्ते करण्यात आलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकार हे शेतकऱ्यांसाठी समर्पित सरकार आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या सूचना आणि सल्ल्यांवर विचार करण्यास तयार आहोत. शेतकऱ्यांनी पुढे येऊन कृषी कायदे समजून घ्यायला हवेत, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“उद्धव ठाकरे पुढे किती दिवस ते मुख्यमंत्री राहतील हे सांगता येत नाही”

“मी कोरोनाची लस घेणार नाही, कोरोनाचे किती अवतार येऊदे मला काही होणार नाही”

“‘त्या’ मध्यरात्री मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता…’; विश्वास नांगरे पाटलांनी सांगितली अंदर की बात

‘स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतकं गर्विष्ठ सरकार सत्तेत आहे’; सोनिया गांधींची मोदी सरकारवर जहरी टीका

“थोरातांना टिळक वाड्यात बसून छत्रपती संभाजीराजांचा इतिहास कळणार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या