बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वीर दासने दोन भारत दाखवले म्हणून उच्चभ्रूंच्या कपाळात…”

मुंबई | बॉलिवूड अभिनेता आणि स्टँड अप कॉमेडीयन वीर दास (Stand up comedian vir das) आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वादाच्या केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळत आहे. वीर दासवर भारताची बदनामी (India Defemation) केल्याप्रकरणी मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली आहे. त्यातच या प्रकरणात आता राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी भाष्य केलं आहे.

वीर दास याने अमेरिकेतील आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत असताना ‘आम्ही अशा भारतात राहतो जिथे दिवसा महिलांचे पूजा करतात आणि रात्री त्याच महिलांवर लैंगिक अत्याचार  केले जातात’, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्याच्या या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. आता नितीन राऊत (Nitin Raut) यांनी या प्रकरणात ट्विट करून भाष्य केलं आहे.

वीर दासने त्याच्या कवितेत दोन भारत दाखवले म्हणून उच्चभ्रूंच्या कपाळात केवढा गोंधळ झाला, असं नितीन राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणत टीव्हीवर जय भीम (Jai bhim Movie) पाहिला तेव्हा त्यात तिसरा भारत दिसतो, असं विधान केलं आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अर्थात राऊत यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नाही. परंतु त्यांच्या ट्विटमुळे आता अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, वीर दासवर सर्वच स्तरातून टीका होत असताना आता नितीन राऊत यांनी केलेल्या ट्विटमुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. तसेच काही दिवसांपूर्वी मुकेश खन्ना यांनी इन्स्टाग्रामवरून व्हिडीओ पोस्ट करत वीर दासने स्टँड अप कॉमेडीचं नाव खराब केलं आहे, असं म्हटलं होतं.

 

थोडक्यात बातम्या

शेअर बाजारात घसरण पण ‘बिगबुल’च्या शेअर्समध्ये तब्बल एवढ्या टक्क्यांची वाढ

मुंबईतील कोरोनाबाधितांसह मृतांची संख्याही दिलासादायक, वाचा ताजी आकडेवारी

“जरा जास्तच मुदत दिल्याबद्दल नारायण राणेेेंचे आभार”, जयंत पाटलांचा पलटवार

महाराष्ट्रातील कोरोना आला आटोक्यात, जाणून घ्या आकडेवारी एका क्लिकवर

मैदानात घातला पंचाशी वाद! ‘या’ भारतीय खेळाडूवर कारवाईची शक्यता

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More