Top News महाराष्ट्र मुंबई

उद्योगांचे वीजदर कमी करण्यासाठी प्रयत्न करणार- नितीन राऊत

मुंबई | राज्यातील उद्योगांचे वीज दर कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू राज्य सरकारकडून भरीव आर्थिक सहाय्य मिळाल्यास वीज दर कमी केले जाऊ शकतात. यासाठी पुढील पावलं उचलली जातील, अशी ग्वाही ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.

ओपन ॲक्सेस आदी विषयांवर सह्याद्री अतिथीगृह येथे एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बेठकीत मंत्री सुभाष देसाई आणि ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत उपस्थित होते.

राऊत म्हणाले की, “राज्यात रोजगार निर्मितीला चालना मिळण्यासाठी मोठे उद्योग येणं आवश्यक आहे. अधिकाधिक उद्योगांना आकर्षित करण्यासाठी अन्य राज्यांच्या तुलनेत वीज दर स्वस्त असावेत यासाठी शासन गंभीर आहे. उद्योगावरील क्रॉस सबसिडीचा हा भार कमी करण्यासाठी राज्य शासनानं हा भार स्वतः स्वीकारायला हवा आणि तशी अर्थसंकल्पात तरतूद करावी यासाठी पुढील पावलं टाकली जातील.”

वीज दर कमी करण्याचा संकल्प ऊर्जा विभागाने केला असून यासाठी चालू वर्षासाठी व पुढील चार वर्षासाठी रोड मॅप तयार करण्याचे निर्देश महावितरणला देण्यात आले आहेत, अशी माहितीही राऊत यांनी दिली.

थोडक्यात बातम्या-

ढोंगी धनंजय मुंडेंना शिक्षा मिळणारच- रेणू शर्मा

राम कदमांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून रोहित पवारांनी साधला निशाणा, म्हणाले…

“आमच्याविरूद्ध तीन पैलवान एकत्र आले तरी आम्ही पुणे महानगरपालिका जिंकू”

धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार पोलिसांनी नाकारली; रेणू शर्मा यांचं पोलीस आयुक्तांना पत्र

धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ गौप्यस्फोटानंतर नवाब मलिक म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या