महाराष्ट्र मुंबई

राज्यातील नोकर भरतीबाबत नितीन राऊत यांची मोठी घोषणा!

मुंबई | ज्याप्रकारे गृहखात्याने नोकर भरतीचं परिपत्रक काढलं त्याचप्रमाणे सामान्य प्रशासन विभागाचं परिपत्रक काढावं आणि त्यानुसार नोकरभरती करावी, अशी मी विनंती केली आहे. ही विनंती मान्य झाली आहे. त्याचबरोबर पदोन्नतीबाबतही मी आवाज उठवला, त्यालाही मान्यता मिळाली, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं आहे.

राज्य मंत्रिमंडळाची आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नितीन राऊत यांनी याबाबत माहिती दिली.

नोकर भरती आणि त्या संबंधित विषयांवर आज बैठकीत चर्चा झाली. मराठा आरक्षणाचा विषय न्यायालयात असल्याने त्यावर नीट मार्ग काढला जाईल, असं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितलं.

दरम्यान, काही तांत्रिक बाबी दूर करून नोकरभरती सुरू करता येईल का याची चाचपणी राज्य सरकारकडून केली जाणार आहे. त्यानंतर रखडलेली नोकरभरती सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती आहे.

थोडक्यात बातम्या-

“विधान परिषदेत सावरकरांचा फोटो लावणं हा स्वातंत्र्यवीरांचा अपमान”

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

‘शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ आहे’; ‘या’ भाजप नेत्याची बोचरी टीका

भाजपने निलेश राणेंवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

ठाकरे सरकार कधी पडेल हे मी आता सांगणार नाही, कारण…- नारायण राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या