बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नाना पटोलेंच्या ‘त्या’ खळबळजनक पत्राबद्दल नितीन राऊतांचा मोठा खुलासा!

नागपूर  | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. नुकतंच काॅंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं होतं. या पत्रानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या पत्राद्वारे नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची तक्रार केल्याचं बोललं जात होतं. मात्र, या पत्राचा ऊर्जा विभागाशी किंवा माझ्याशी काहीही संबंध नसल्याचं नितीन राऊत यांनी आता स्पष्ट केलं आहे.

या पत्राविषयी बोलताना नितीन राऊत म्हणाले की, नाना पटोले यांनी खनिजकर्म महामंडळाकडून महाजनकोला कोळसा पुरवणाऱ्या कंत्राटावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या या पत्राचा ऊर्जा विभागाशी काहीही संबंध नाही.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रातून नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना तक्रार करत महाजेनकोच्या गैरकारभाराकडे बोट दाखवलं आहे. महाजेनको म्हणजेच राज्याच्या वीजनिर्मिती कंपनीमध्ये कोळसा पुरवठा आणि कोळसा वाशिंगच्या निविदा प्रक्रियेत गैरमार्गाचा वापर, घोळ आणि अनधिकृतपणे पदाचा वापर करून काम दिल्याचा ठपका नाना पटोलेंनी ठेवला आहे.

तसेच नाना पटोलेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना महाजेनकोने दिलेल्या कामाच्या अंतिम आदेशाला स्थगिती देण्याची विनंती देखील केली आहे.  तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी देखील पटोलेंनी केली आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘कसौटी जिंदगी की’ फेम अभिनेता प्राचीन चौहानला तरुणीची छेड काढल्याप्रकरणी अटक

“यापुढे त्रास दिला तर हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही”

“15 वर्षात आम्ही एकत्र अनुभव, आनंद आणि हास्य शेअर केलं पण आता…”

“अण्णा हजारे 7 वर्षांच्या कुंभकर्णीय झोपेतून खडबडून जागे झालेत”

बंडातात्या यांच्यावर केलेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीसांकडून निषेध, म्हणाले…

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More