बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

UPSC Result | लातूरच्या नितीशाचा देशात डंका; 21व्या वर्षीच UPSC परीक्षेत यशाला गवसणी

लातूर | देशातील अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी काल युपीएससीनं दिली आहे. 2020 च्या युपीएससी परिक्षांचा निकाल घोषीत करण्यात आला आहे. निकालात महाराष्ट्रातील विद्यार्थी मोठ्या संख्येनं उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांत लातूरची नितीशा जगताप अवघ्या 21 व्या वर्षी आयएएस बनली आहे.

नितीशा जगतापच्या यशाने लातूरकर आंनदात आहेत. नितीशा देशात 199 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या नितीशाने पहिल्या प्रयत्नातच हे यश मिळवलं आहे. नितीशाला तिच्या घरच्यांनी पुर्ण पांठिंबा दिला होता.

लातूरचे रहीवाशी असलेल जगताप कुटुंब मध्यमवर्गीय आहे. नितीशा जगताप हीचे वडील एलआयसी एजंट आहेत. नितीशाच्या अभ्यासासाठी तीची आई पुण्यात राहायला होती. नितीशाच्या शिक्षणासाठी घरच्यांनी नितीशाला पुण्यात पाठवलं होतं. नितीशा पहिल्याच प्रयत्नात पास झाल्यानं तिचं कौतुक केलं जात आहे.

पुण्यातील नामांकित महाविद्यालयात शिक्षण झाले आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना नितीशाने युपीएससीची तयारी चालू केली होती. पदवी पुर्ण होताच नितीशा जिल्हाधिकारी बनली आहे.

थोडक्यात बातम्या 

मुंबई विमानतळावर ‘इतके’ हजार प्रवासी आढळले कोरोना पॉझिटिव्ह

परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ; ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावलं

मराठवाड्याच्या निलेशची UPSC मध्ये गगनभरारी, सलग दुसऱ्यांदा मिळवलं यश

“सरकार चालवता येत नसेल तर खुर्च्या उबवायचं काम करु नका, राजीनामा द्या”

‘मनापासून माफी मागतो’; राजेश टोपेंनी विद्यार्थ्यांची मागितली माफी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More