मराठ्यांनाही आरक्षण मिळावं, नितीश कुमार यांची मागणी

नवी दिल्ली | मराठा आरक्षणाची मागणी करत बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी आरक्षणाच्या मुद्द्याला हात घातलाय. मराठा असो किंवा पटेल प्रत्येकाला आरक्षण मिळालच पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय.

महिला आरक्षणाचं समर्थन करत प्रलंबित विधेयक संसदेत संमत करण्यासाठी सर्वसंमती व्हावी, असं अपीलही नितिश कुमार यांनी केलंय. आरक्षणाची मागणी म्हणजे नितिश कुमार यांचं राजकीय पाऊल समजलं जातं.

दरम्यान, नितिश कुमार यांनी संसदेच्या पुढील सत्रात खासगी कंपन्यांमध्ये आरक्षणावरून चर्चा करण्याची मागणीही सर्व पक्षांकडे केलीय.