बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नितीश कुमार यांचं मोदी आणि भाजपला जशास तसं प्रत्युत्तर!

पाटणा |   नितीश कुमार सरकारने रविवारी बिहारमध्ये मंत्रीमंडळात विस्तार केला परंतू भाजपला मंत्रीमंडळ विस्तारात कुठलंही स्थान दिलं नाही. जेडीयूने मोदी आणि भाजपला या कृत्याने जशास तसे प्रत्युत्तर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

गुरूवारी नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मात्र ‘एनडीए’तला घटकपक्ष असलेला जेडीयूने सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. अपेक्षित वाटा न मिळाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता.

आम्ही मंत्रीमंडळामध्ये सहभागी होणार नाही मात्र भाजपासोबत राहू, असं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, नितीश कुमार यांनी केलेल्या मंत्रीमंडळ विस्तारात भाजपच्या एकाही आमदाराला त्यांनी स्थान दिलं नाही. त्यामुळे ते भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा रंगत आहेत.

महत्वाच्या बातम्या

-मोदी-राहुल गांधींच्या नावानं विनोद करणं पडलं महागात; खेळणी विक्रेत्याला अटक

-‘या’ अभिनेत्रीला मोदींसोबत डिनर करायचं आहे…!

-सलमान म्हणतो, ‘हा अभिनेता पुढील काळात सर्वात मोठा सुपरस्टार असेल’

-भारताचा कर्णधार जखमी; भारतीय संघाला मोठा धक्का

-“जोपर्यंत शिवसेनेचा महापौर असणार तोपर्यंत त्याला राणीच्या बागेतच बसवला पाहिजे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More