बिहार | बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश राज येणार हे स्पष्ट झालं आहे. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने म्हणजेच एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखलीये.
दरम्यान नितीश कुमार यांच्या पक्षाच्या कमी जागा येऊनही मुख्यमंत्रीपदाची सूत्र हातात घेत असताना त्यांच्यावर टीका होतायत. यावर नितीश कुमार यांनी मला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचा मोह नसल्याचं सांगितलंय.
बिहार निवडणुकीचे निकालानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना नितीश कुमार म्हणाले, राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होईल यासंदर्भातील निर्णय रालोआच्या बैठकीत घेतला जाईल. याचवेळी लोक जनशक्ती पक्षाला सहभागी करून घ्यायचे की नाही याबाबतही निर्णय घेण्यात येईल.
दरम्यान निवडणुकीत नितीशकुमार यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आता तरी ते अंतरात्म्याचा आवाज ऐकत खुर्चीचा मोह सोडतील का? असा सवाल तेजस्वी यादव यांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या-
“नारायण राणे दु:खी आत्मा, त्यांची अवस्था विक्रम-वेताळासारखी”
“जयंतराव फुकटातलं मिळालं ते हजम करा, आमची काळजी करू नका”
भाजप हा माझ्या बापाचा पक्ष, त्याचा मला अहंकार नाही तर प्रेम- पंकजा मुंडे
“पवारांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार पाच वर्षं पूर्ण करणार”
भाऊ-बहिणीच्या नात्यात पक्ष आडवा, माजी कृषी मंत्री गहिवरले