नितीश कुमार यांचा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

nitish kumar
नितीश कुमार

पाटणा | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला.

बुधवारी संध्याकाळी नितीश कुमारांनी जेडीयूच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यानंतर राज्यपालांना भेटून त्यांनी राजीनामा दिला.

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे जेडीयू तेजस्वी यादवांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा यासाठी आग्रही होते. मात्र तेजस्वी यादवांनी त्यास नकार दिल्याने नितीश कुमार यांनी हे पाऊल उचललं. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या