बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बिहारमध्ये सत्ता स्थापनेसाठी नितीश कुमारांनी शरद पवारांचा सल्ला घ्यावा”

मुंबई | बिहारमध्ये भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने म्हणजेच एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखलीये. तर नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार आहेत. दरम्यान नितीश कुमार यांनी बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न राबवावा असा सल्ला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलाय.

उदय सामंत म्हणाले, “बिहारमध्ये सत्ता स्थापन करताना नितीश कुमार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा सल्ला घ्यावा. नितीश कुमारांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारखं खंबीर नेतृत्व केलं तर राज्यातील महाविकास आघाडीसारखा पॅटर्न बिहारमध्येही निर्माण होऊ शकतो.”

ते पुढे म्हणाले, भाजपा प्रादेशिक पक्षांना कशा पद्धतीने संपवतंय हे देशाला पुन्हा एकदा कळलंय. याचं महाराष्ट्रानंतरचं दुसरं उदाहरण बिहार आहे.

दरम्यान यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी, बिहारमध्ये बिहारचाच पॅटर्न चालणार. आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएचं सरकार होईल असं स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बिहारच्या विजयी सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘या’ नेत्याला दिला मोठा इशारा

‘हा’ नेता बनणार बिहारचा मुख्यमंत्री?; नरेंद्र मोदींच्या भाषणात स्पष्ट संकेत

…तेव्हा आम्ही राज्यात पर्यायी सरकार देऊ; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

“फायद्यासाठी बिहारमध्ये दंगली घडवण्याचा भाजपाचा डाव होता”

अर्णब गोस्वामींना मोठा दिलासा, अंतरिम जामीन मंजूर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More