संविधान वाचवण्यासाठी ‘या’ नेत्यांनी एकत्रित यावे; बड्या नेत्याचं विधान

India l देशातील लोकसभेचा निकाल काल जाहीर झाला आहे. अशातच आता देशाच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी लवकरात लवकर भारत आघाडीचा भाग व्हावे, असे माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे.

यशवंत सिन्हा यांचा पीएम मोदींवर हल्लाबोल :

माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे की, संविधान वाचवण्यासाठी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी भारत आघाडीचा भाग बनले पाहिजे, इतिहास त्यांच्या पावलावर पाऊल टाकेल, असे ते म्हणाले आहेत. तसेच केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप करत ते म्हणाले की, देशाचे भविष्य उद्ध्वस्त केले जात आहे. ईडी आणि सीबीआयसारख्या एजन्सीचा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे असे माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी सोशल मीडियावर म्हणाले आहेत.

यशवंत सिन्हा यांनी केंद्र सरकारवर आरोप करत म्हटले की, पंतप्रधान मोदी निर्लज्जपणे भारताचे भविष्य उद्ध्वस्त करत आहेत. राजकारणी आणि व्यावसायिकांवर दबाव टाकण्यासाठी ईडी, सीबीआय आणि आयकर एजन्सीचा वापर केला जात आहे. बेकायदेशीर इलेक्टोरल बाँड्स आणि क्रोनी कॅपिटलिस्टच्या माध्यमातून मनी पॉवरचा वापर निवडणुका आणि खासदार किंवा आमदार खरेदी करण्यासाठी केला जात आहे.

India l एनडीएचे यावेळी नुकसान झाले :

एनडीए देशभरात 300 च्या खाली आहे. त्याचवेळी भाजपला स्वबळावर बहुमत मिळताना दिसत नाही. नितीश कुमार यांच्या पक्षाने बिहारमध्ये 12 जागा जिंकल्या असून, त्यानंतर ते एकप्रकारे किंग मेकरच्या भूमिकेत आले आहेत. मात्र, त्यांनी एनडीएचा मित्रपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे.

यापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा करत असल्याचा दावा केला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांनी इंडिया ब्लॉकच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची पहिली बैठकही आयोजित केली होती, परंतु नंतर ते पुन्हा एकदा एनडीएचा भाग बनले.

News Title : Nitish Kumar should immediately join India alliance

महत्त्वाच्या बातम्या- 

महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 जागांचा निकाल वाचा एकाच ठिकाणी

महाराष्ट्रात सर्वाधिक स्ट्राईक रेटसह सर्वात मोठा पक्ष कोणता?

या राशीच्या व्यक्तींना पराभवातून सावरावे लागेल

बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे पराभूत, बजरंग सोनवणे विजयी

मराठवाड्यात फक्त जरांगे फॅक्टर, बघा कुणाकुणाचा काढला घाम!