पाटणा | यंदा मला मुख्यमंत्री बनण्याची जराही इच्छा नव्हती. मात्र माझ्यावर हे पद स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यामुळे मी दबावामध्ये हे पद स्वीकारल्याचा दावा नितीश कुमार यांनी केलाय.
कोणालाही मुख्यमंत्री बनवा. कोणत्याही व्यक्तीला मुख्यमंत्री केलं तरी मला त्याचा फरक पडणार नाही. या पदावर राहण्याची माझी जराही इच्छा नाहीय, असं नितीश कुमार म्हणालेत.
नितीश कुमार यांच्या वक्तव्यावर जनता दल युनायडेटनेही स्पष्टीकरण दिलं आहे. पक्षाचे प्रवक्ते राजीव रंजन यांनी नितीश यांना कोणत्याही पदाची हाव नसल्याचं म्हटलं आहे.
बिहारची राजधानी पाटणा येथे रविवार पार पडलेल्या जनता दल यूनायटेडच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद माजी आयएएस व राज्यसभा सदस्य आरसीपी सिंह यांच्याकडे सोपवलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“भाजपची ईडी आता सनम बेवफा झाली आहे; तिकडे फिरकलीच नाही”
मी त्यांना सांगितलं होतं, मात्र माझं कोणी ऐकलंच नाही- रोहित पवार
“तुम्ही चार द्या, पण दोन घ्यायची तयारी ठेवायलाच हवी”
…चांगलं काम केलं तर नोटीस मिळत नाही- देवेंद्र फडणवीस
“ईडीला आता कुणी घाबरत नाही, शरद पवार आणि ठाकरेंना नोटीस आली पुढे काय झालं?”