नवी दिल्ली | संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून भाजपमध्ये घेतलं असल्याचं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितलं आहे.
एनआरसी आणि सीएएच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर प्रशांत किशोर यांनी सुरूवातीपासून कायद्याला विरोध दर्शवला. याच पार्श्वभूमीवर नितीश कुमार आणि प्रशांत किशोर यांच्यात चांगलंच शाब्दिक खटके उडाले.
अमित शहा यांनी सांगितलं होतं की प्रशांत यांना पक्षात घ्या. मग जर आता त्यांना संयुक्त जनता दलमध्ये राहायचे असेल तर पक्षाच्या ध्येय, धोरणानुसार वागावे लागेल. जे पक्ष सोडून जाऊ इच्छित आहेत त्यांनी जावं, अशा शब्दात कुमार यांनी किशोर यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, नितीश कुमार यांना जे म्हणायचं होतं ते त्यांनी म्हटलं आहे. तुम्हाला माझ्या उत्तराची प्रतिक्षा करावी लागेल, मी बिहारमध्ये येऊन याचे उत्तर देणार असल्याचं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“देशाची संस्कृती टिकली ती शीख आणि मराठ्यांच्या तलवारीच्या जोरावर”
महत्वाच्या बातम्या-
सत्ता गेल्याने भाजप नेते वैफल्यग्रस्त- बाळासाहेब थोरात
“ही लढाई बाबासाहेबांचं संविधान आणि गांधींचा विचार वाचवण्यासाठी”
दिल्ली काबीज करण्यासाठी गेलेल्या फडणवीसांची मुख्यमंत्री केजरीवालांवर टीका
Comments are closed.