Top News राजकारण

नितीश कुमार भाजपाला धोका देतील; चिराग पासवान यांची टीका

बिहार | बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झालीये. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात एकूण 71 जागांसाठी मतदान होणार आहे.

दरम्यान निवडणूकीच्या या रणधुमाळीत जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. चिराग पासवान यांनी, नितीश कुमार हे भाजपला धोका देतील असं म्हटलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजा बिहार दौऱ्यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नितीशकुमार भाजपाला धोका देतील आणि ते राजदसोबत जातील, असं विधान चिराग पासवान यांनी केलं आहे.

2015 साली बिहारच्या निवडणुकीत नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या राजदसोबत निवडणूक लढवलेली. या गठबंधनामुळे नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले होते. त्यानंतर नितीश कुमार यांनी उपमुख्यमंत्री आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर असलेल्या कथित घोटाळ्यांच्या आरोपांमुळे गठबंधनामधून बाहेर पडत भाजपसोबत सरकार स्थापन केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

‘बाबा मला नेहमी म्हणायचे की…’, वडिलांच्या आठवणीत मनदीप सिंग भावूक

…तर राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही- उदयनराजे भोसले

…मग 370 कलम हटवल्यावर नक्की बदलले काय?; शिवसेनेचा केंद्र सरकारला सवाल

…तर उपसभापतीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासही तयार- अशोक चव्हाण

शरद पवार हॅट्स ऑफ!, आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचं अप्रूप वाटलं- पंकजा मुंडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या