पटणा | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी बिहार निवडणुकांसाठी सासाराम येथे पहिली जाहीर प्रचारसभा घेतली. त्यावेळी त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार आणि त्यांच्या सरकारचे कौतुक केलं आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले की, “बिहारमध्ये नितिशकुमार सरकारने तातडीने वेळीच पावले उचलली नसती, तर कोरोना साथीमुळे माणसे मोठ्या संख्येने मृत्यूमुखी पडली असती. अतिशय भयानक स्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. परंतू सरकारने योग्य त्या उपाय योजना करुन ती परिस्थिती आटोक्यात आणली”.
बिहार राज्यांला बिमारु बनविणाऱ्यांना जनतेने पुन्हा सत्तेवर आणू नये, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी राजद, काँग्रेस आदि विरोधी पक्षांना चांगलाच टोला लगावला आहे.
गरिबांच्या कल्याणासाठी असलेला पैसा पूर्वी भ्रष्टाचारांच्या खिशात जात असे, पण आता त्याला आळा बसला आहे. त्यामुळेच कोरोना साथीमध्ये राज्यातील गरीब लोकांना अन्नधान्य वाटप करणे शक्य झाले असल्याचे सांगितले.
महत्वाच्या बातम्या-
आता खैर नाही, मी खडसेंना कोर्टात खेचणार- अंजली दमानिया
“…म्हणून चंद्रकांत पाटील भाजपमध्ये आले”
पवार साहेब तुम्ही मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला हे बरं झालं, नाहीतर मी…- एकनाथ खडसे
आरारारारा खतरनाक!; चेन्नईच्या समर्थकांची आता काही खैर नाही
“राष्ट्रवादी नाथाभाऊंना लिमलेटची गोळी देतं की कॅडबरी हे पाहावं लागेल
Comments are closed.