बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“त्यांना हवं असेल तर ते मला गोळ्या देखील घालू शकतात”

नवी दिल्ली | राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव हे नुकतेच बिहारमधील पाटणा याठिकाणी पोहचले आहेत. त्यावेळी त्यांनी बिहारमध्ये नितीश कुमार आणि एनडीए सरकारचे विसर्जन करणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आगामी दोन विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी लालू प्रसाद यादव प्रचार करणार आहेत. त्यावेळी त्यांनी एनडीएचं विसर्जन करणार असल्याचं वक्तव्य केल्यानंतर त्यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ते मला गोळ्या घालू शकतात. ते आणखी काही करू शकत नाही. त्यांना हवं असेल तर ते मला गोळ्या घालू शकता, असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.

बिहारच्या विधानसभा पोटनिवडणुकीत राजद आणि काॅंग्रेस स्वतंत्र लढणार आहेत. यावेळी दोन्ही पक्ष एकमेकांनावर टीका करत आहेत. तसेच या दोन्ही जागांवर आम्हीचं विजय मिळवू, असा दावा लालू प्रसाद यादव यांनी केला आहे. पोटनिवडणुकीसाटी लालू प्रसाद यादव बुधवारी प्रचार करण्यासाठी सुरूवात करणार आहे.

दरम्यान, देशात गगनाला भिडणाऱ्या महागाईवरून लालू प्रसाद यादव यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. आज तुपापेक्षा डिझेल महाग झाले आहे. प्रत्येक वस्तूच्या किमती पेटल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या इंधन दरवाढीमुळे त्याचा परिणाम इतर गोष्टीवर होत आहे, असंही लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं.

थोडक्यात बातम्या-

मलिकांनी घेतली मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट; मुंबई पोलीस दलात हालचालींना वेग

“…म्हणून किशोरी पेडणेकर यांनी राजीनामा द्यावा”

“भारतीय चित्रपट सृष्टीला तातडीने स्वच्छ करण्याची गरज, इथं सर्वात जास्त…”

“युद्धपातळीवर आढावा बैठका सुरू पण, येत्या 6 महिन्यात…”

“महाराष्ट्रात होणाऱ्या छाप्यांमागे देवेंद्र फडणवीसांचा हात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More