निवेदिता माने आज शिवसेनेत प्रवेश करणार!

निवेदिता माने आज शिवसेनेत प्रवेश करणार!

मुंबई| राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी खासदार निवेदिता माने आज दुपारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हातकणंगले मतदार संघातून त्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशिल माने यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी द्यावी, अशी निवेदिता माने यांची मागणी होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शरद पवार यांनी राजू शेट्टी यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवल्यानं धैर्यशिल मानेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता आणि निवेदिता माने यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता.

दरम्यान, निवेदिता माने आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या –

-मुंबई-दिल्ली विमानात बाॅम्ब असल्याच्या फोनमुळं खळबळ

-ब्राह्मण आरक्षण मिळणं अशक्य- देवेंद्र फडणवीस

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 84 परदेश दौऱ्यांवर 2 हजार कोटींचा खर्च!

-माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला- नितीन गडकरी

-अबब!! इशा अंबानीच्या लग्नात चक्क अमिताभ आणि आमीर वाढपी

 

Google+ Linkedin