पिंपरी | आपल्या कीर्तनात गावरान गावठी शब्दांचा तडका देत ठसकेदार कीर्तन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर आपल्याच वादग्रस्त वक्तव्याने गोत्यात आले आहेत. एकीकडे काही लोक इंदुरीकरांना पाठिंबा देत आहेत तर दुसरीकडे पुरोगामी राजकीय नेते इंदुरीकरांवर चांगलेच तुटून पडले आहेत. अशातच इंदुरीकर महाराजांचे चाहते देखील त्यांच्या पाठिंब्यासाठी आता मैदानात उतरले आहेत.
आज इंदुरीकरांचं मोशी येथे कीर्तन पार पडलं. त्याअगोदर त्यांच्या चाहत्यांनी त्यांची जंगी मिरवणूक काढली. वादाच्या पार्श्वभूमीवर आयोजकांनी योग्य ती खबरदारी घेतली होती. लोक मोठ्या संख्येने इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ऐकायला आले होते.
मी हात जोडून विनंती करतो पण ते कॅमेरे बंद करा… तुम्ही पार माणूसच संपवला, अशी उद्विग्न भावना महाराजांनी मोशीतल्या कीर्तन सोहळ्यात व्यक्त केली.
दरम्यान, मातीतला पैलवान जसा मातीश नाळ तुटू देत नाही तशी महाराजांनी कीर्तनाशी असलेली नाळ कधी तुटू देऊ नये, असं म्हणत भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी महाराजांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा जाहीर केला.
ट्रेंडिंग बातम्या-
“पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे वागणार नाही ना… मला काही सांगायचं आहे”
“अजित पवारांनी भाजपला व फडणवीस साहेबांना ‘मामु’ बनवलं”
महत्वाच्या बातम्या-
सरकार पाच वर्ष टिकवायचं आहे; शरद पवांरांचा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कानमंत्र
हो खरं सांगतोय; सई ताम्हणकरच आहे सविता भाभी!
इंदुरीकरांच्या कीर्तनात कीर्तन कमी आणि तमाशाच जास्त असतो- कपिल पाटील
Comments are closed.