बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इंदुरीकर महाराजांचा झटका; एकाच इशाऱ्यात यूट्यूब चॅनेलवाल्यांनी व्हिडीओ उडवले!

पुणे | ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या वादामुळे इंदुरीकर महाराजांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला असून आपल्या नावाने यूट्यूबवर पैसे कमवणाऱ्या चॅनेल्सना त्यांनी अद्दल घडवण्याची तयारी सुरु केल्याचं कळतंय. इंदुरीकरांच्या इशाऱ्यानंतर यूट्यूब चॅनेलवाल्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून अनेकांनी व्हिडीओ डिलीट केले आहेत.

निवृत्ती महाराज इंदुरीकर गावोगाव जाऊन कीर्तन आणि प्रवचन करत असतात. काही जणांनी इंदुरीकरांच्या नावाने यूट्यूब चॅनेल काढले आहे तर काही मराठी कीर्तनकार किंवा तत्सम नावाने चॅनेल काढून त्यांचे हेच गावोगावचे व्हिडीओ रेकॉर्ड करुन यूट्यूबवर टाकत असतात.

इंदुरीकर महाराजांचे कीर्तन किंवा प्रवचन यूट्यूबला टाकून लाखो रुपयांची कमाई केली जाते. वास्तविकपणे इंदुरीकर महाराजांना यातला रुपयाही जात नाही. त्यातच त्यांच्या कीर्तनातील मसालेदार किंवा वादग्रस्त वक्तव्ये शोधून त्याचे थंबनेल तयार करुन असे व्हिडीओ ट्रेंड केले जातात. यामागे मोठा आर्थिक लाभ संबंधितांना होतो, मात्र महाराजांची प्रतीमा मात्र मलीन होते.

दरम्यान, इंदुरीकर महाराजांनी आतापर्यंत या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं होतं. मात्र आता याच चॅनेलवाल्यांमुळे आपल्याला फटका बसत असल्याचा दावा त्यांनी नुकताच नगरमधील एका कार्यक्रमात केला आहे. महाराजांच्या इशाऱ्यानंतर यूट्यूबवर त्यांच्या नावाने चालणाऱ्या चॅनेल्सनी आपले सर्व व्हिडीओ डिलीट केले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

आता आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचं किर्तन सोडून शेती करणार- इंदुरीकर

“सत्तेसाठी भुकेल्या शरद पवारांनी उसनं अवसान आणू नये”

महत्त्वाच्या बातम्या-

‘2024च्या आधी पुन्हा पुलवामा हल्ला होईल’; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

गद्दारांना पक्षात स्थान नाही, दोन दिवसांत हकालपट्टी करणार- राज ठाकरे

“यूट्यूब चॅनेलवाले काड्या करतात, यांनीच मला संपवण्याचा प्रयत्न केला”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More