बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संजय राऊतांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही अन् ‘सामना’ही वाचत नाही”

मुंबई | पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या निकालावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केलीच तर त्यासोबत त्यांनी काँग्रेसला निवडणुकीत आलेल्या अपयशावरही भाष्य केलं. संजय राऊतांच्या या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत काय बोलता याच्याकडे आमचं लक्ष देखील नाही. जे काही आम्हाला त्यांना सांगायचं होतं ते अगोदरच आम्ही सांगितलेलं आहे. त्यांचा सामाना पेपर वाचणं देखील आम्ही बंद केलेलं असल्याचं नाना पटोले म्हणाले. टीव्ही-9 शी ते बोलत होते.

ज्या ठिकाणी आमच्या नेत्यावर, संघटनेवर टीका करण्याचा प्रयत्न होत असेल तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं बरं, अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. पण दुसऱ्यावर टीका करून आपला पक्ष मोठा होतो असं कोणाला वाटत असेल, तर आपल्याकडे चार बोटं आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं, असंही नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, आसामध्ये काँग्रसेला चांगलं यश मिळालं पण सत्तेवर येऊ शकले नाही. केरळ, तामिळनाडूनत त्यांना थोडफार यश आहे. पण काँग्रेसनं अजून मुसंडी मारणं गरजेचं आहे. आपल्या देशाला विरोधी पक्षाच्या उत्तम आघाडीची आवश्यकता असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

“उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला नाही, त्यांनी राजीनामा द्यावा”

एकेकाळी शरद पवारांचे कट्टर विरोधक समजले जाणारे संभाजीराव काकडे यांचं दु:खद निधन

आसामच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला; हेमंत बिस्वा शर्मा यांनी घेतली शपथ

उजनीचं पाणी पेटलं! “एक थेंबही पाणी देणार नाही, अन्याय झाला तर राजीनामा देईल”

ईडी अधिकारी असल्याची बतावणी करत बाजार समिती संचालकांकडे मागितली खंडणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More