बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आईचा मृतदेह नेण्यासाठी मिळाली नाही ॲम्बुलन्स, स्मशानापर्यंतचा प्रवास सुन्न करणारा

हैदराबाद | आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथे काळीज पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. मृत आईला रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह बाईकवरून स्मशानभूमीत नेण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जी चेन्चुला या श्रीकाकुलम जिल्ह्याच्या मंडासा मंडल गावात राहत होत्या. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. परंतु तेथे त्यांचं निधन झालं. त्यांचा कोरोना तपासणी अहवाल आला नव्हता. अहवाल येण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

महिलेचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी नेण्यासाठी कुटूंबियांनी बराच वेळ पाहिली. परंतु त्यांना कुठेच रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. अखेर महिलेचा जावाई आणि मुलाने मृतदेह बाईकवर बसवून स्मशानभूमीत नेला.

दरम्यान, कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. रुग्णांना रुग्णालय, बेड, ऑक्सिजन आणि औषधांची पूर्तता होत नाहीये. एवढंच नाही तर मृत्यूनंतरही त्यांची फरफट होताना दिसत आहे. तेलंगणाच्या कामारेड्डी जिल्ह्यातही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली. याठिकाणी एक व्यक्ती लोकांकडे मदतीची विनवणी करत होता परंतु कोणीही पुढं आलं नाही. ना त्याला अँम्ब्युलन्स मिळाली ना त्या व्यक्तीची अवस्था पाहून कोणाचं मन हेलावलं. अखेर स्वत: पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन पतीने साडेतीन किलोमीटर पायपीट करत क्रबिस्तानपर्यंत पोहचून तिला दफन केलं.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

18 वर्षावरील नागरिकांना कोरोना लसीसाठी वाट पाहावी लागणार, आरोग्यमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा

पुण्यात कॅालेजला जाता येता झाली ओळख, मुलगी गर्भवती झाल्यावर बलात्कार झाल्याचं उघड

‘तुम्ही मला बुधवार पेठेत कधी पाहिलं?’; मानसी नाईक भडकली

राज्यातील लॉकडाऊन ‘या’ तारखेपर्यंत वाढवला, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

दुसरं लग्न करणार का?, आशुतोष सोडून गेल्यानंतर मयुरी पहिल्यांदाच या विषयावर बोलली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More