बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चुकीला माफी नाही! राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नेत्यांवर अखेर गुन्हा दाखल

पंढरपूर | पंढरपूर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार ठरवण्यासाठी श्रीयश पॅलेस येथे आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यक्रमाला कोरोनाचे नियम मोडित काढत गर्दी जमा झाली होती. शेवटी कोरोना नियमांचे पालन न झाल्यानं या कार्यक्रमाच्या आयोजकांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अजित पवार यांनी पहिल्या टप्प्यात पंढरपूर व मंगळवेढा या भागातील विविध शिष्टमंडळाची भेट घेताना प्रत्येक शिष्टमंडळात 20 सदस्य बंधनकारक केले होते. मात्र, कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने जमा झालेले राष्ट्रवादी समर्थक या कार्यालयात घुसले आणि मग सभा झाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांनी आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मात्र हे सगळे कोरोनाचे नियम मोडत असल्यानं निवडणुकीसाठी नेमलेले फोटोग्राफर प्रमुख मिघाराज कोरे यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप मांडावे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला, अशी माहिती डीवायएसपी विक्रम कदम यांनी दिली आहे.

पंढरपूर पोटनिवडणूक ही 13 एप्रिल रोजी होत असून 23 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होत आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून चार उमेदवार इच्छुक असल्याची माहिती सोलापूर जिल्हा बूथ अभियान प्रमुख बाळाभाऊ भेगडे यांनी दिली आहे.

दरम्यान, भाजपकडून विधान परिषदेचे विद्यमान आमदार प्रशांत परिचारक, उद्योजक समाधान अवताडे, उद्योजक अभिजित पाटील आणि स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य बब्रुवान रोंगे या चौघातील एक उमेदवार येत्या चार दिवसात जाहीर होईल असं सांगितलं आहे.  तर राष्ट्रवादीकडून दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके किंवा त्यांचा मुलगा भगीरथ भालके यांच्यापैकी एक नाव निश्चित केलं जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

थोडक्यात बातम्या

अवघ्या 23 वर्षांची अंकिता झाली ‘या’ गावची सरपंच; गावाबद्दल असलेलं स्वप्न ऐकूण तुम्हीही व्हाल थक्क

परमबीर केंद्र सरकारचा बोलका पोपट; अंडरवर्ल्डशी लिंक असलेल्यांशी घरोब्याचे संबंध- विनायक राऊत

शरद पवारांकडून गृहमंत्र्यांना क्लीनचीट, मात्र काँग्रेस म्हणते मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा!

मी आनंदी आहे, आता ATS करेक्ट कार्यक्रम करेल- शरद पवार

विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांवर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More