बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चुकीला माफी नाही!, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

वाशिम |  महाराष्ट्रातील शेतकरी कर्जबाजारी झाल्याने व एकुणच आर्थिक विवंचनेत सापडला असताना वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुुबार पेरणीचं संकट ओढावल्याने येथिल शेतकरी चिंतातुर झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील सोयाबिन पेरलेल्या शेतकऱ्यांवर ही वेळ आल्याचं दिसुन येत आहे.

वाशिम जिल्ह्यात सोयाबिनचं बोगस बियाणं पेरल्यामुळे सोयाबिन हे पिक उगवत  नसल्याच्या अनेक तक्रारी शेतकरी करत असल्याचं पाहायला मिळत असताना आता या प्रकरणाची गंभीर दखल राज्याचे गृहराज्यमंत्री व वाशिमचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी घेतली आहे. तसेच तात्काळ कारवाईचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे.

शिवसंपर्क अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी बोगस बियाणांसंदर्भात येणाऱ्या सर्व तक्रारी दाखल करून घेऊन संबंधित कंपनीविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश वाशिमच्या पोलिस अधिक्षकांना दिले आहेत. तसेच या संबंधी तात्काळ स्वरूपात कारवाई करण्यासही सांगितलं आहे.

वाशिम येथे माध्यमांशी बोलत असताना संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबद्दल विचारलं असता याबाबत मी बोलणं योग्य नसल्याचं म्हणत संपुर्ण निर्णय हे पक्षप्रमुखच घेतील, असं शंभुराज देसाई यांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या 

जनतेच्या सेवेत समर्पित, म्हणत राज्यमंत्री झाल्यावर भारती पवार संसदेत जाताना नतमस्तक

मनसे कात टाकतेय; पुण्यातून महत्त्वाची माहिती समोर

मुंबई-पुणेकरांना पाऊस झोडणार, ‘या’ 9 जिल्ह्यांनाही रेड अलर्ट!

“CM फंडसाठी निधी द्या, वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी गर्दी नको”

“ज्यांनी यंत्रणाचा यथेच्छ गैरवापर केला, हीच पाळतखोर मंडळी आकांडतांडव करताहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More