बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

यंदा पायी वारी झालीच पाहीजे, आम्ही तडजोड स्वीकारणार नाही- तुषार भोसले

मुंबई | आषाढी यात्रा हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक सोहळा मनाला जातो. शेकडो वर्षांपासून पालख्या आणि सोबत लाखोंचा जनसागर घेत हे सोहळे पंढरीच्या दिशेने पायी चालत येतात. मात्र गेल्या वर्षी कोरोना आला आणि ही पायी वारीची परंपरा महामारीमुळे बस मधून पालख्या आणून पूर्ण करण्यात आली.

गेल्या वर्षी आलेली पहिली लाट खूपच सौम्य होती मात्र यंदाची दुसरी लाट खूपच घातक सिद्ध झाली असून आजही अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. शेकडोंच्या प्राण गमावले आहेत. यामुळे यंदाही आषाढी वारी होणार की नाही? असा प्रश्न वारकऱ्यांना पडला आहे.

सरकारने अद्याप वारीबाबत निर्णय घेतला नाही. मात्र भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने यावर्षी पायी वारी झालीच पाहीजे, अशी मागणी केलीये. तसेच वारीबाबत आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही, असा इशारा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी वेळकाढूपणा न करता त्वरीत वारकऱ्यांसोबत चर्चा करुन नियमावली तयार करावी, आणि पायी वारीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

जवान देवदूतासारखे धावून आले अन् लोकलखाली जाता जाता वाचला प्रवासी, पाहा व्हिडीओ

कोरोनासारखी संकटे पुढेही येऊ शकतील- नरेंद्र मोदी

नोकरीची सुवर्णसंधी; कोकण रेल्वेमध्ये ‘या’ पदांसाठी भरती, असा करा अर्ज

भाजप मनसेला टाळी देणार का?; मनसे-भाजप युुतीबाबत फडणवीस म्हणाले…

अनलॉकचे पाच टप्पे निश्चित; सरकारकडून नियमावली जाहीर, वाचा एका क्लिकवर

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More