बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात आज एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यु नाही

नागपूर | महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत होती. परंतु, हळूहळू ही रुग्णसंख्या आता आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूर जिल्ह्यातून आता दिलासादायक आकडेवारी समोर येत आहे.

नागपूर जिल्ह्यात आज अवघ्या 16 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच आज दिवसभरात नागपूरमध्ये एकाही कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे.

नागपुरमधील कोरोना हळूहळू आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. आज एकूण 232 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. तसेच आतापर्यंत 4 लाख 66 हजारांहुन अधिक रूग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. सध्या नागपूर हे कोरोनामुक्त होत असलं तरीही प्रशासनातर्फे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये नागरिकांना लॉकडाऊनमधून शिथिलता देण्यात येत आहे. तसेच पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील अनलॉकला सुरुवात झाली आहे. दर आठवड्याला जिल्ह्याचा आढावा घेऊन संबंधित जिल्ह्याचे स्तर प्रशासनातर्फे ठरवण्यात येत आहेत.

थोडक्यात बातम्या –

महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा पूर्णपणे अनलॉक; चित्रपटगृह, मॉल्स यांसह सर्व आस्थापना होणार सुरू

चितळे बंधूंना 20 लाखांची खंडणी मागणाऱ्यांना क्राईम ब्रांचने अशा प्रकारे सापळा रचत केली अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांचं केलं कौतुक, म्हणाले…

मोठा निर्णय! रुग्णसंख्या घटल्यानंतर ‘या’ राज्यानं लाॅकडाऊन हटवला

काय सांगता!!! आता पुरुष देखील प्रेग्नेंट होणार?; वैज्ञानिकांचा अजब प्रयोग यशस्वी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More