बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशात ओमिक्रॉनचे किती रूग्ण? केंद्राने दिली ‘ही’ महत्वाची माहिती

नवी दिल्ली | कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे असं वाटत असताना कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने (Corona New Varient) अनेक देशात डोकं वर काढलं. दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन विषाणू (Omicron) वेगाने पसरत आहे त्यामुळे जगभरातील देशाची चिंता वाढली आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सगळेच देश सतर्क झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी द.आफ्रिकेतून भारतात परतलेले काही प्रवासी कोरोनाबाधित आढळल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे देशात ओमिक्रॉन विषाणूचे किती रूग्ण आहेत? असा प्रश्न विचारला जात होता. देशातील ओमिक्रॉन प्रकारच्या रूग्णांबद्दल केंद्र सरकारने (Central Goverment) महत्वाची माहिती दिली आहे.

देशात सध्या कोरोनाच्या ओमिक्रॉन या प्रकाराचा एकही रूग्ण आढळलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. ओमिक्रॉन प्रकाराचा एकही रूग्ण आढळला नसून या विषाणूच्या प्रतिबंधासाठी कठोर पाऊलं उचलली जात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडविया यांनी दिली आहे. (Corona Virus Update)

’14 देशांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएटचे रूग्ण सापडले आहेत. देशात सध्यातरी ओमिक्रॉन प्रकारचा एकदी रूग्ण आढळला नाही. सर्व विमानतळांवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून संशयित रूग्णांचे नमुने जेनेटिक सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात येत आहेत,’ अशी माहितीही मंडविया (Mansukh Mandvia) यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

धाकधूक वाढली; भारतात परतलेल्या ‘त्या’ 100 प्रवाशांपैकी एक जण कोरोनाबाधित

एअर इंडियानंतर मोदी सरकारने आता ‘ही’ कंपनी काढली विकायला!

उद्धव ठाकरेंच्या तब्येतीसाठी ममता बॅनर्जींची सिद्धिविनायकाकडे प्रार्थना; दिला ‘हा’ नवा नारा

मुंबईसाठी एकहाती सामने जिंकणाऱ्या पांड्या बंधूंचा पत्ता कट; वाचा रिटेन खेळाडूंची यादी

केंद्राच्या विरोधाला न जुमानता उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More