बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आर्यनकडे ड्रग्ज आढळलंच नव्हतं’; एनसीबीचा मोठा खुलासा

मुंबई | मुंबई ते गोवा जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रुझवर एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी कारवाई केली. यात अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने ताब्यात घेतल्याने सगळीकडे चांगलीच खळबळ उडाली होती. चर्चेचा विषय ठरलेल्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे.

एनसीबीच्या विशेष पथकाने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात काही महत्त्वाचे निष्कर्ष सादर केले आहेत. एनसीबी मॅन्युएलमध्ये अनिवार्य असूनही छाप्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केलेला नव्हता. शिवाय, गुन्ह्यात अटक केलेल्या अनेक आरोपींकडून जप्त केलेले ड्रग्ज सिंगल रिकव्हरी म्हणून दाखवले असल्याचा निष्कर्ष एनसीबीच्या एसआयटीने दिला आहे.

आर्यन खानकडे ड्रग्ज आढळलेच नव्हते, असा धक्कादायक खुलासा एनसीबीच्या विशेष पथकाने केला आहे. आर्यनकडे ड्रग्ज आढळलेच नव्हते त्यामुळे त्याचा फोन घेऊन त्याचे चॅट्स तपासण्याची गरज नव्हती. चॅट्स असे सुचवत नाहीत की आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा भाग होता, असे निष्कर्ष एनसीबीच्या विशेष पथकाने काढले आहेत.

दरम्यान, आर्यन खानकडे ड्रग्ज आढळले नसतानाही ड्रग्ज सेवनाची शिक्षा होऊ शकते का, या पैलुवर मतं घेतली जात आहेत. एसआयटीचा तपास अजून पूर्ण झाला नाही. अंतिम अहवाल सादर करण्यासाठी आणखी काही महिने लागू शकतात, अशी माहिती एनसीबीचे महासंचालक एस.एन.प्रधान यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

“मी पुन्हा सांगतो, बाप-बेटे जेलमध्ये जाणार म्हणजे जाणार”

‘या’ भागात मुसळधार पाऊस कोसळणार, पुढचे पाच दिवस महत्त्वाचे

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी शरद पवारांचा मोदी सरकारला सल्ला, म्हणाले…

“…पण ज्यांना मुल बाळ नाही त्यांना काय कळणार”

“अमर, अकबर, अँथनीचं सरकार आहे, पायात पाय अडकून पडेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More