बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ना परिक्षा ना मुलाखत, महाराष्ट्र पोस्टात नोकरीची संधी; पगारही चांगला

मुंबई | सध्या कोरोनाच्या महामारीमध्ये अनेकांना आपल्या कामाला मुकावं लागलं आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून सरकारी नोकरी मिळणंही कठीण झालं होतं. त्यातच भारतीय डाक विभागामध्ये महाराष्ट्र आणि बिहारमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्रातील पोस्ट विभागात ग्रामीण पोस्टमनच्या 2482 पदांवर ही भरती होणार असून बिहारमध्ये 1940 पदांवर ग्रामीण पोस्टमनची भरती करण्यात येणार आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या आणि कमी शिक्षण असलेल्या लोकांसाठी ही सुवर्णसंधी चालून आली आहे.

दरम्यान, ग्रामीण पोस्टमनच्या पदांवर होणाऱ्या भरतीमध्ये दहावी पास असणं बंधनकारक आहे. त्याबरोबरच 60 दिवसांचा काॅम्प्युटरचा कोर्स देखील करणं आवश्यक असल्याचं भारतीय डाक विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या व्यतिरिक्त कोणतीही शिक्षणाची अट ठेवण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, उमेदवारांच्या निवडीदरम्यान कोणतीही मुलाखत किंवा परीक्षा घेण्यात येणार नसून दहावीच्या गुणांच्या आधारावर निवड प्रक्रिया पार पडणार आहे. पोस्टातील भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय 18 वर्ष ते 40 वर्ष दरम्यान असायला हवं. तसेच ओपन, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस या वर्गात येणाऱ्या उमेदवारांना 100 रुपये शुल्क आकारण्यात येणार असून एससी, एसटी आणि महिलांसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

या पदांमध्ये ब्रांच पोस्ट मास्टर या पदासाठी टीआरसीए स्लॅबमध्ये चार तासांसाठी 12 हजार रुपये प्रति महिना वेतन देण्यात येणार आहे. त्याबरोबरच टीआरसीए स्लॅबमध्ये पाच तासांसाठी 14 हजार 500 रुपये प्रति महिना वेतन असणार आहे. असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर किंवा डाक सेवक यांच्यासाठी ती टीआरसीए स्लॅबमध्ये चार तासांसाठी 10 हजार रुपये तर पाच तासांसाठी 12 हजार रुपये प्रति महिना वेतन देण्यात येणार आहे.

सरकारी नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या लोकांना भारतीय डाक विभागाने ही सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली असून 27 एप्रिल म्हणजेच आजपासुन दोन्ही राज्यातील भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संबंधित भरती प्रक्रियेत नोंदणी करण्यासाठी http://appost.in/gdsonline/home.aspx  या संकेतस्थळावर इच्छुक उमेदवारांनी भेट द्यावी.

थोडक्यात बातम्या –

आईचा कोरोनाने मृत्यू; बातमी कळताच मनाला सावरत स्वत:च्या कामाची जबाबदारी अगोदर पूर्ण केली

‘नमस्कार, राज बोलतोय….’; मुख्यमंत्र्यांना मदतीची मागणी करणाऱ्या शिक्षिकेला राज ठाकरेंचा फोन

दिलासादायक! देशातील सक्रिय कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट,पाहा आकडेवारी

‘या’ अभिनेत्रीचा आपल्या आजीसोबतचा डान्स सोशल मीडियावर होतोय तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

शरीरसंबंध ठेवण्यास पत्नीने दिला नकार, पतीने पत्नीवर गोळ्या झाडून त्यानंतर केला ‘हा’ धक्कादायक प्रकार

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More