आमदार हेमंत रासने यांची मोठी घोषणा, म्हणाले ‘मी सार्वजनिक ठिकाणी…’

No Flex Banners in Public Places in Pune MLA Hemant Rasane  Announcement

MLA Hemant Rasane | कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी पुण्यात सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे फ्लेक्स लावणार नसल्याची घोषणा केली आहे. लोकसहभागाची सुरुवात स्वतःपासून करत असल्याचे, त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (MLA Hemant Rasane)

फ्लेक्स लावण्यावर बंदी

स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी, तसेच परिसराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘विकसित कसबा’ अभियानाअंतर्गत (Vikasit Kasba Abhiyan) स्वच्छ भारत स्पर्धेत सातत्याने सात वर्षे पहिला क्रमांक मिळवणाऱ्या इंदूर (Indore) शहराचा काही दिवसांपूर्वी अभ्यास दौरा केला होता, असे रासने यांनी सांगितले.

गेल्या तीन महिन्यांत मतदारसंघातील कचऱ्याची साठवणूक होणारे 26 क्रॉनिकल स्पॉट (Chronicle Spot) सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर बंद करण्यात यश मिळाले आहे. जे क्रॉनिकल स्पॉट बंद केले आहेत, त्या ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकू नये, यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. तसेच आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांची संख्या वाढविली असून काही भागात दोन वेळा कचरा संकलित करण्यात येत आहे. राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त येत्या बुधवारी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत या 26 ठिकाणी ‘स्वच्छता नारायणा’च्या महापूजा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्वच्छतेसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे पूजन केले जाणार आहे.

14 विकासकामांचा पाठपुरावा करणार

स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा अभियान
मराठा साम्राज्याच्या जाज्वल्य इतिहासाचे प्रतीक असणाऱ्या शनिवारवाड्याचे (Shaniwarwada) पुनरुज्जीवन
वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी सारसबाग ते शनिवारवाडा (बाजीराव रस्ता) आणि शनिवारवाडा ते स्वारगेट (छत्रपती शिवाजी महाराज रस्ता) भुयारी मार्ग
सारसबाग आणि पेशवे उद्यानाचा एकात्मिक विकास
ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरातील जुन्यावाड्यांचा प्रश्न.

इतर विकासकामे

डॉ. कोटणीस आरोग्य केंद्राचा पुनर्विकास, खडक पोलीस वसाहतीतील धोकादायक इमारतींची पुनर्बाधणी, मामलेदार कचेरी येथील रखडलेले शासकीय इमारतींचे बांधकाम, दुरावस्था झालेल्या पुणे महानगरपालिका वसाहतींचा पुनर्विकास, नेहरू स्टेडियमचा खेळासाठी विकास, लोकमान्यनगर भागातील म्हाडा प्रकल्पाचा एकात्मिक विकास, श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर विस्तारासाठी शासकीय जागा हस्तांतरित करण्याची विनंती, कसबा गणपती मंदिर, ओमकारेश्वर मंदिर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर यांना ‘ब’ वर्ग दर्जा मिळणे या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. (MLA Hemant Rasane)

Title : No Flex Banners in Public Places in Pune MLA Hemant Rasane  Announcement

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .