Top News देश

‘2021 मध्ये सर्वांना कोरोनाची लस मिळेल याची शाश्वती नाही त्यामुळे…’; रामदेव बाबांचा नागरिकांना मोलाचा सल्ला

नवी दिल्ली | सर्व जगभर हैदोस घातलेल्या कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे कोरोनाची लस बनवण्यासाठी सर्व देशातील शास्त्रज्ञ मोठ्या शर्तीचे प्रयत्न करत आहेत. अशातच योगगुरू बाबा रामदेव यांनी कोरोना लसीबाबात मोठं वक्तव्य केलं आहे.

आपल्या देशाची लोकसंख्या जवळजवळ 135 कोटी आहे. त्यामुळे देशतील सर्वसामान्य लोकांना 2021 मध्ये कोरोनाची लस मिळेल याची शाश्वती नसल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.

प्रत्येक नागरिकाला लस मिळणं शक्य नाही त्यामुळे अशा परिस्थितीत लोकांनी योग, आयुर्वेदिक आणि आपल्या जीवनशैलीत बदल केले तर प्राण वाचतील असं रामदेव बाबांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे केंद्राने देशात सगळ्यांना लस दिली जाणार असल्याचं आश्वासन कधीच दिलं नाही. धोका असलेल्या लोकांना लस देऊन कोरोनाचा फैलाव थांबवू शकलो, तर आम्हाला संपूर्ण देशात लसीकरण करण्याची गरज पडणार नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“स्पर्धा करा, पण महाराष्ट्रातून ओढूनताणून काही नेऊ देणार नाही हे लक्षात ठेवा”

‘चहा कसला देता… आम्ही जिलेबी देतो’; शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा प्रस्ताव धुडकावुन लावला

“कोरोना लस चाचणीतील दुष्प्रभावाला केंद्र, राज्ये सरकार जबाबदार नाहीत”

सोनिया गांधी आणि राहुल गांधींविषयी आदर, पण….- उर्मिला मातोंडकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या