बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही मात्र कमी उपस्थितीत काम करण्याबाबत विचार- मुख्यमंत्री

मुंबई | सरकारी कार्यालये 7 दिवस बंद ठेवण्याचा शासनाने निर्णय घेतलेला नाही. मात्र कमी उपस्थिती काम करण्याबाबत विचार सुरू असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. 50 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम होऊ शकते का? याबाबत विचार सुरू असल्याचं उद्धव यांनी सांगितलं आहे.

सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांसमोर बोलताना विविध विषयावर माहिती दिली आहे. प्रथमत: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व सरकारी कार्यालये 7 दिवस बंद ठेवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, असं वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलं होतं. मात्र असा निर्णय शासनाने घेतलेला नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबईची लोकल आणि बससेवा बंद करणार नाही. विविध धार्मिक स्थळं बंद करण्याबाबत मी सगळ्या धर्मियांना आवाहन करतो, असंही उद्धव म्हणाले.

दरम्यान, खासगी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांबाबत सरकार एवढा बारीक विचार का करत आहे? असे प्रश्न आता लोक विचारू लागले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

सर्व सरकारी कार्यालये 7 दिवस बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय

अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मुंबई रेल्वेने लढवली नामी शक्कल!

महत्वाच्या बातम्या-

सावधान… मुंबई-पुण्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला!

पाकिस्तानवरही कोरोनाचा ‘अ‌ॅटॅक’, घेतला पहिला बळी तर 184 जणांना कोरोनाची लागण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More