आरोग्य कोरोना पुणे महाराष्ट्र

पुणेकरांनो आतातरी घरी बसा, आयसीयू, ऑक्सिजन अन् बेडही नाहीत!

पुणे | पुणे शहरातील एका कोरोना बाधीत रूग्णाला श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. या रूग्णासाठी एका इसमाने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडं ऑक्सिजन बेडची मागणी केली. मात्र संपूर्ण पुणे शहरात कोठेही ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं आहे.

आरोग्य प्रशासनाचा सावळागोंधळ यामुळे समोर आला आहे. छातीत धडकी भरवणाऱ्या या घटनेचा विचार करता पुणेकरांनी आता अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. पुण्यातील आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांना हा सुन्न करणारा अनुभव आला असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे प्रशासनाकडून आरोग्य व्यवस्थेची पुरेशी यंत्रणा उपलब्ध असल्याचा दावा पोकळ असल्याचं या घटनेनं निदर्शनास आलं आहे. डॉ. मोरे यांनी नगर रस्त्यावरील त्यांच्या मित्राच्या भावासाठी ऑक्सिजन बेड कोठे उपलब्ध आहे, अशी विचारपूस केली असता, शहरात कोठेही बेड उपलब्ध नसल्याचं धक्कादायक उत्तर त्यांना देण्यात आलं.

तुमचा नाव आणि नंबर देऊन ठेवा, बेड उपलब्ध झाल्यावर तुम्हाला कळवण्यात येईल, असंही त्यांना काॅलवर सांगण्यात आलं आहे. दरम्यान, विश्रांतवाडीतील एका नागरिकाला बेड उपलब्ध न झाल्यामुळे ससून रुग्णालयातच या रुग्णाला जीव गमवावा लागल्याची घटनाही शहरात याआधी घडली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

सचिन पायलट यांनी भूमिका बदलली; भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत!

अभिनेता अभिषेक बच्चनला रूग्णालयातून डिस्चार्ज

महत्वाच्या बातम्या-

हट्टाला पेटतो त्यालाच मराठा म्हणतात… ‘जंगजौहर’चा रक्त सळसळ करायला लावणारा टीझर

ऐश्वर्याला कोरोना झाला हे कळताच विवेक ओबेरॉयचं ट्विट, म्हणतो…

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीच…. गेल्या 24 तासांत तब्बल ‘इतके’ रूग्ण वाढले!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या