बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे दर जारी, वाचा ताजे दर

नवी दिल्ली | वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचा खिशाला आधीच कात्री लागली आहे. त्यात गेल्या दहा दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) दरात सातत्याने वाढ झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या दहा दिवसात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात नऊ वेळेस वाढ झाली आहे.

तब्बल साडेचार महिने पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिल्यानंतर 22 मार्च पासून पेट्रोल-डिझेलच्या दरात नऊ वेळेस वाढ झाली आहे. गेल्या दहा दिवसांत सातत्याने इंधन दरवाढ झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलचे दर आज स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारी तेल कंपन्यांकडून आज सकाळी पेट्रोल डिझेलचे नवे दर जारी करण्यात आले. मुंबई आणि राजधानी दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दर कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. गेल्या 10 दिवसांत तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या किमतीत 6.40 रूपयांनी वाढ केली आहे. तर डिझेलच्या किंमतीतही जवळपास एवढ्याच रूपयांनी वाढ झाली आहे.

दरम्यान, आज मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलसाठी 116.72 रूपये तर प्रतिलीटर डिझेलसाठी 100.94 रूपये मोजावे लागत आहेत. तर राजधानी दिल्लीत प्रतिलीटर पेट्रोलचे दर 101.81 रूपये आणि प्रतिलीटर डिझेलचे दर 93.07 रूपये आहे. सलग नऊ दिवस इंधन दरवाढ झाल्यानंतर नागरिकांना आज दिलासा मिळाला आहे.

थोडक्यात बातम्या-

“अटलजींच्या काळात लोकशाही पाहिली, आता हुकुमशाहीचा अनुभव घेतोय”

“मुख्यमंत्र्यांचा कारभार भारी, माझे कुटुंब माझी जबाबदारी, बाकी सगळे फिरू दे दारोदारी”

Sharad Pawar: UPA अध्यक्षपदासाठी शरद पवारांचं नाव चर्चेत, रोहित पवार म्हणाले…

Narendra Modi: पंतप्रधान मोदी सर्वांत शक्तिशाली भारतीय; वाचा दुसऱ्या क्रमांकावर कोण?

मोठी बातमी! राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले, आता मास्क सक्तीही नाही

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More