बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पत्नी आणि मुलीसाठी सुट्टी मिळाली नाही; पोलिस अधिकाऱ्याचा बेधडक निर्णय

लखनऊ | कोरोना महामारीच्या काळात अनेकांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे अनेकांना याचा त्रास सहन करावा लागला आहे. यातच आता उत्तर प्रदेशच्या झाशीमधील सर्कल ऑफिसर यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सर्वजण त्याचं कौतुक करत आहे. सर्कल ऑफिसर मनीष सोनकर यांनी सुट्टी मिळत नसल्यानं त्यांनी आपल्या नोकरीचा थेट राजीनामाच दिला आहे.

दोन आठवड्यांपूर्वी मनीष सोनकर यांच्या पत्नीला खूप ताप आला. त्यानंतर 20 एप्रिल रोजी सोनकर यांनाही ताप आला होता. त्यानंतर आतापर्यंत सोनकर यांनी पाच वेळा करोनाची चाचणी केली होती. यातली प्रत्येक चाचणी निगेटीव्ह आली. त्यामुळे औषधे घेऊन सोनकर कामावर जात होते. 30 एप्रिल रोजी सोनकर यांच्या पत्नीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी आयसोलेशनमध्ये राहण्यास सुरुवात केली. त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी देखील आईजवळ राहू लागली.

काही दिवसांनी मुलगीही कोरोनाबाधित झाली. त्यानंतर सोनकर यांनी फोन करुन एसएसपींशी चर्चा करुन आपल्या परिस्थितीसंदर्भात सांगत 1 मे ते 6 मे दरम्यान सुट्टी मागितली. परंतू, प्रशासकिय कामामुळे त्यांची सुट्टी मान्य झाली नाही. राजीनामा देताना सोनकर यांनी आपली कोरोनाबाधित पत्नी आणि चार वर्षाच्या मुलीची देखभाल करण्यासाठी सुट्टी मिळत नसल्याचं कारण दिलं आहे.

दरम्यान, सोनकर यांची पत्नी होमिओपॅथिक डॉक्टर आहे. पत्नी आणि मुलीची काळजी घेतानाच सोनकर हे स्वत: आरोग्य विषयक समस्यांना तोंड देत लॉकडाऊन संदर्भातील सरकारी बैठका, तपासण्या यांसारख्या गोष्टींसाठी हजर राहत होते. त्यांच्या या धडक निर्णयामुुळे उत्तर प्रदेशात सर्वजण त्याचं कौतुक करत आहे.

थोडक्यात बातम्या-

हैदराबाद संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याने आयपीएलचं यंदाचं पर्व रद्द, राजीव शुक्लांचं स्पष्टीकरण

नाशिकमध्ये छातीत दुखून अचानक होणाऱ्या मृत्यूंबाबत संभ्रम कायम 2 दिवसांत चक्क 5 जणांचा मृत्यू 

“मन की बात आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाही, सगळंच रामभरोसे”

धक्कादायक! कोरोनाबाधित वृद्ध जोडप्याची ‘या’ कारणामूळे रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या

देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट, जाणुन घ्या दिलासादायक आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More