बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भ्रष्टाचार कितीही मोठा असला तरी केंद्र सरकार त्याची पाळेमुळे खणून काढणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | सीबीआय आणि सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन यांची संयुक्त परिषद गुजरातमध्ये पार पडत आहे. या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहिले आहेत. परिषदेत बोलताना मोदी यांनी देशात चालणाऱ्या भ्रष्टाचारावर भाष्य केलं आहे.

भ्रष्टाचार कितीही मोठा असला तरी देखील त्याची पाळेमुळे खणून काढण्याची ताकद आताच्या सरकारमध्ये असल्याचं मोदी यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच देशातील भ्रष्टाचार संपूर्णपणे नष्ट करण्याची राजकीय इच्छाशक्ती आताच्या सरकारमध्ये असल्याचा विश्वास गेल्या सहा सात वर्षांमध्ये जनतेत निर्माण झाल्याचं देखील मोदींनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, भ्रष्टाचारामुळे कोणाच्या न कोणाच्या अधिकारावर गदा येत असते. यामुळे अनेकांना त्यांच्या अधिकारापासून वंचित राहावं लागतं. तसेच भ्रष्टाचारामुळे राष्ट्राच्या प्रगतीमध्ये बाधा येऊन सामूहिक शक्ती प्रभावित होत असते.

हा भ्रष्टाचार कितीही मोठा असला तरी आपले सरकार त्याला सोडणार नाही. त्यामागे कितीही मोठी शक्ती असली तरी आताचं सरकार त्याला थारा देत नाही. नव्या भारतात भ्रष्टाचार हा व्यवस्थेचा मार्ग होऊच शकत नाही, असं देखील मोदी यांनी यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

‘या’ कारणामुळे शिवसेना खासदार भावना गवळी दुसऱ्यांदा ईडीच्या चौकशीसाठी गैरहजर

सुयश टिळक अन् आयुषी भावेच्या हळदीचे सोनेरी क्षण, पाहा फोटो

राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट आता ‘या’ वेळेपर्यंत राहणार खुली; वाचा काय आहे नवी नियमावली

लोकप्रिय आमदार निलेश लंके लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर!

‘बांगलादेशाप्रमाणेच मुंबईतही हिंदू असुरक्षित; मुख्यमंत्र्यांच्या बंगाल पॅटर्नचा पर्दाफाश करणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More