बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोणी कितीही शड्डू ठोकले तरी पुढील महापौर सुद्धा शिवसेनेचाच होणार”

मुंबई | सध्या महाराष्ट्र राज्यात पुढील येणाऱ्या निवडणूकांवरून खूपच चर्चा रंगताना दिसत आहेत. काही पक्षांनी तर 2024च्या विधानसभा निवडणूकीसाठी स्वबळाचे नारेही दिले आहेत. अशातच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मुंबईचा पुढील महापौर कोणाचा होणार? याबद्दल वक्तव्य केलं आहे.

कोणी कितीही शड्डू ठोकले तरी पुढील महापौर सुद्धा शिवसेनेचाच होणार, असं मत किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलं आहे. आज शिवसेनेचा 55 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. मुंबई ज्या पद्धतीने शिवसेना चालवतं आहे. ज्याप्रकारे मुंबईच्या नागरिकांची काळजी आम्ही घेतोय, त्यावरून पुढील येणाऱ्या काळात शिवसेनेचाच महापौर असणार असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

शिवसेनेने प्रत्येक निवडणुकीमध्ये संघर्ष केलेला आहे. प्रत्येक दिवसाला आम्हाला संघर्ष असतो. आमची शिवसेना ही चळवळ करणारी आहे. त्याचप्रमाणे आम्ही कोणाशी संघर्ष करायला जात नाही, आणि जर कोण आलं तर त्याला त्या संघर्षामध्ये घातल्याशिवाय राहत नाही, असंही पेडणेकर म्हणाल्या आहेत.

तसेच या वर्षीचा वर्धापन दिन कोरोना रोगाचे संकट पाहता साधेपणाने साजरा केला आहे. आमच्या वर्धापन दिनाला नेहमीच विशेष महत्व असते. या दिवशी शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्यकडून आचार-विचारांची लैयलूट व्हायची. त्यामुळे आम्ही सर्वच शिवसैनिक या दिवसाची पाट पाहून असायचो, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“सोनिया सेनेचे अध्यक्ष नाव महाराजांचं घेतात, काम मात्र औरंगजेबाचं करतात”

‘येत्या निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत युती करणार का?’; अजित पवार म्हणाले…

शिवप्रसाद काय असतो, ते राऊतांनी वैभव नाईकांना विचारावं- नितेश राणे

सीबीएसई बोर्डाच्या मार्किंग पद्धतीला विद्यार्थ्यांचा विरोध, सर्वोच्च न्यायालयात दिलं आव्हान

जुन्या आठवणींना उजाळा! ‘हा’ फोटो शेअर करत जयंत पाटीलांनी शिवसेनेला दिल्या शुभेच्छा, म्हणाले…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More