बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला”

मुंबई | मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरण सध्या देशात चांगलंच चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे तपास अधिकारी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप करत खळबळ माजवली आहे. बॉलिवूडमधील अभिनेत्यांकडून खंडणी वसूली, लाचखोरी आणि बनावट जातीचा दाखला तयार करत नोकरी लाटल्याचा आरोप मलिक यांनी समीर वानखेडेंवर केला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मलिकांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला आहे.

तुम्ही त्याला धमक्या दिल्या, त्याला अपमानीत केलं. त्याच्या पत्नीला शिव्या दिल्या. त्याच्या बहिणीवर आरोप केले, त्याच्या आई वडिलांना बदनाम केलं. त्याचा जात धर्म काढला. तरीही तो डगमगला नाही. कर्तव्य बजावत राहिला. तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला म्हणत त्यांनी मी समीर वानखेडेंना पाठिंबा दर्शवत आहे, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

तसेच चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओही ट्विटवर प्रसारित केला आहे. मी क्रांती रेडकरसोबत असल्याचं जाहीर केलं आहे. आर्यन खानच्या पाठिशी सर्व बॉलिवूसह सरकार उभं राहिलं आहे. तर जीव धोक्यात घालणाऱ्या समीर वानखेडे आणि त्यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांच्यावर असभ्य भाषेत टीका होत आहे. जेव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेव्हा सत्ताधाऱ्याचं खरं रूप समोर येतं, अशी जहरी टीका चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

दरम्यान, सर्वज्ञानी जनाब संजय जी राऊत तुम्हाला समीर वानखेडे हा अधिकारी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी नसून मुसलमान आहे हे सिद्ध करणाऱ्यांची पाठराखण करण्याची एवढी कसली घाई लागली आहे? असा खडा सवाल वाघ यांनी राऊत यांना केला आहे.

पहा ट्विट –

थोडक्यात बातम्या –  

मलिकांनी घेतली मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट; मुंबई पोलीस दलात हालचालींना वेग

“…म्हणून किशोरी पेडणेकर यांनी राजीनामा द्यावा”

“भारतीय चित्रपट सृष्टीला तातडीने स्वच्छ करण्याची गरज, इथं सर्वात जास्त…”

“युद्धपातळीवर आढावा बैठका सुरू पण, येत्या 6 महिन्यात…”

“महाराष्ट्रात होणाऱ्या छाप्यांमागे देवेंद्र फडणवीसांचा हात”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More