बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चंद्रकांत पाटील आम्हाला काहीही म्हटले तरी, आम्ही भाजप नेत्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही”

मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यात बोलताना नाना पटोलेेंवर निशाणा साधत, नाना पटोले हे पप्पू आहेत. केंद्रात जसे एक पप्पू आहेत, तसेच महाराष्ट्रात देखील एक पप्पू आहेत. ते त्यांच्या तोंडाला येईल ते बोलत असतात, असं म्हटलं होतं. त्यावर प्रत्यूतर देताना आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी चंद्रकांत पाटील यांना जोरदार टोला लगावला आहे.

राज्यातील सत्ता गेल्यापासून भाजपचे नेते सैरभेर झालेले आहेत. केंद्राच्या मदतीने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे सगळे प्रयत्न विफल झाल्याने आता त्यांचा तोल ढासळला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला काहीही म्हटले तरी, आम्ही भाजप नेत्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही, ती आमची संस्कृती नाही, असं म्हणत नाना पटोलेंनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिलं.

आमच्यावर केलेल्या टीकेमुळे पेट्रोल, डिझेल व जीवनाश्यक वस्तूंचे दर कमी होणार असतील, देशातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळणार असेल. मोदी सरकारने आणलेले तीन शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द होणार असतील, केंद्र सरकारने जाणिवपूर्वक कोर्टाच्या माध्यमातून रद्द केलेले मराठा आणि ओबीसी आरक्षण मिळणार असेल तर चंद्रकांत पाटलांच्या टीकेचे स्वागतच आहे, असंही पटोलेंनी म्हटलं.

दरम्यान, चंद्रकांत पाटलांना तेलकट थापा मारून केंद्राचे अपयश आणि मराठा, ओबीसी समाजाच्या फसवणूकीचे पाप झाकता येणार नाही, असा टोलाही पटोलेंनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.

थोडक्यात बातम्या – 

नाना पटोलेंसारख्या लहान माणसांवर मी भाष्य करणार नाही – शरद पवार

कोरोनामुळे ‘या’ जिल्ह्यात पहिल्यांदाच अवघ्या 9 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

“हक्काचं असताना दिलं जात नसेल, तर मी माझ्या कर्मानं इथला पालकमंत्री बनेल”

माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील- संजय राठोड

“ईडीसारखी यंत्रणा ही सरकारच्या हातातलं बाहुलं झालंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More