बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काहीही झालं तरी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येणार नाही असं वाटत होतं, पण…- देवेंद्र फडणवीस

मुंबई | जेव्हा शिवसेनेचं राष्ट्रवादीशी बोलणं सुरू झालं तेव्हा, तीन पक्षांच्या चर्चा सुरू आहेत. हे लोक एकत्र येऊ शकतात, असं आम्हाला सांगितलं जात होतं. त्यावेळी राष्ट्रवादी आणि सेना एकत्र येईल असं वाटत होतं. पण काही झालं तरी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येणार नाही असंच वाटत होतं, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते ‘लोकसत्ता’ला  दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

काँग्रेसचा इतिहास पाहता तसं वाटत होतं. पण आपण चुकलो. आमचं राष्ट्रवादीसोबत जाणं जेवढं अनैतिक होतं. तेवढंच हे सरकारही अनैतिक आहे. पण परिस्थिती गोष्टी घडवत असते, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अजित पवारांसोबत सरकार स्थापन केल्याचा पश्चाताप होत नाही. पण असं सरकार स्थापन करायला नको होतं. शंभर टक्के सांगतो. ती चूकच होती, अशी कबुली देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

त्या गोष्टीचा पश्चाताप होत नाही, पण एवढंच सांगतो असं सरकार करायला नको होतं, ही चूक आहे. शंभर टक्के सांगतो ही चूक असली तरी पश्चाताप होत नाही. कारण ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खूपसला जातो त्यावेळी राजकारणात तुम्हाला जिवंत राहावं लागतं. त्यामुळे जिवंत राहण्यासाठी जे जे करावं लागतं ते करावं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

“देवेंद्र फडणवीस यांनी फ्रस्टेशनमधून काही बोलू नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना”

आपल्या माहूताचा झालेला मृत्यू पाहून हत्तीला आवरलं नाही रडू, पाहा व्हिडीओ

पाच दिवसाच्या बाळासह ओढ्यात अडकली होती ओली बाळंतीन, माऊलींनी वाचवला जीव, पाहा व्हिडीओ

‘लाॅकडाऊन करूनही फारसा फायदा झाला नाही’; हसन मुश्रीफांचं धक्कादायक वक्तव्य

सह्याद्री अतिथीगृहाच्या स्लॅबप्रमाणे सरकार कधी कोसळेल ते कळणारही नाही- प्रविण दरेकर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More