Top News देश

“काही झालं तरी राम मंदिरासाठी देणगी देणार नाही”

Photo Credit- Facebook/ Siddaramayya

बंगळुरु | राम मंदिरासाठी जमा होत असलेल्या देणगीवरून राजकारण तापताना दिसत आहे. जेडीएस नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपांनंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांनी राम मंदिरासाठी देणगी देणार नसल्याचं सांगितलंय.

राम मंदिरासाठी देणगी मागायला आलं, तर त्यांना सांगेन की, अयोध्येतील वादग्रस्त राम मंदिरासाठी काही झालं तरी देणगी देणार नाही. त्यामुळे दुसरीकडे बांधल्या जात असलेल्या राम मंदिरासाठी देणगी देईन, असं सिद्धारामैय्या यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच अयोध्येतील वादग्रस्त राम मंदिर प्रकरणी तोडगा निघाला असला, तरी वाद कायम राहणार आहे, असं सिद्धारामैय्या यांनी म्हटलं आहे.

राम मंदिर निधी समर्पण अभियानचे कार्यकर्ते कर्नाटकात देणग्या गोळा करण्याचं काम करत आहेत. मात्र जे स्थानिक पैसे देत नाहीत. त्यांची नावं लिहून घेत आहेत. ते असं का करत आहेत. याची मला कल्पना नाही. मात्र नाझींनी जे जर्मनीमध्ये केलं तेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतोय, असा आरोप कुमारस्वामींनी केला होता.

कुमारस्वामींनी केलेल्या या आरोपांनंतर विश्व हिंदू परिषदेने यावर नाराजी व्यक्त केलीये. कुमारस्वामी यांनी बेजबाबदारपणे ट्विट केलं आहे, असं विश्व हिंदू परिषदेने म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

महिला वर्षभर ‘लिव्ह इन’मध्ये राहून नंतर सांगतात माझ्यावर बलात्कार झाला- अबू आझमी

पुढील दोन दिवसांत ‘या’ भागात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

तयार राहा, माझं आणखी एक गाणं येतंय- अमृता फडणवीस

दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, राहिले फक्त एवढे दिवस!

200 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, धरपकड सुरु; पुण्यातील या कारवाईनं गुंडांचे धाबे दणाणले!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या