बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवाब मलिकांचा राजीनामा घेणार?, जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावरुन राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. नवाब मलिकांवर झालेल्या ईडी कारवाईनंतर विरोधकांनी मलिकांना चांगलंच निशाण्यावर घेतलेलं पहायला मिळत आहे.

नवाब मलिकांना ईडी कोठडी सुनावल्यापासून भाजप आक्रमक झालेली दिसत आहे. मलिकांचा राजीनामा घ्या, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. अशातच आता मलिकांच्या राजीनाम्यावरुन वातावरण तापलेलं असताना या वादात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उडी घेतली आहे.

भाजपकडून वारंवार होणाऱ्या मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिकांवर खोटे आरोप करत भाजप त्यांच्या राजीमान्याची मागणी करत आहे. कितीही गोंधळ घालायचा तेवढा घालू देत नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे आणि आताही करतो, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

दरम्यान, दाऊद इब्राहिम आणि मनी लाॅर्डिंग प्रकरणात नवाब मलिक यांना ईडीनं 3 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. त्यामुळे मलिकांच्या अडचणी सध्या वाढलेल्या दिसत आहे. आता नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

Corona : वनस्पतींपासून बनवण्यात आलेल्या ‘या’ लशीला सरकारची मान्यता

“संजय तू पुरावे देच, मी पण तुझ्या नेत्यांच्या कारनाम्याची लिस्ट ईडीकडे पाठवतो”

सर्वात मोठी बातमी; आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला वेगळं वळण

“मी पुन्हा सांगतो, बाप-बेटे जेलमध्ये जाणार म्हणजे जाणार”

‘या’ भागात मुसळधार पाऊस कोसळणार, पुढचे पाच दिवस महत्त्वाचे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More