अल्लाहू अकबर असो वा जय श्रीराम असो… संसदेत घोषणाबाजी नको- प्रकाश आंबेडकर

नवी दिल्ली | संसदेत कोणत्याही धर्माच्या घोषणा नको. मग अल्लाहू अकबर असो वा जय श्रीराम असो… संसदेत धार्मिक घोषणा कशाला?? असं भूमिका भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे.
संसदेत घोषणाबाजी न होता कामकाज व्यवस्थितपणे आणि सुरळितपणे चाललं पाहिजे. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घोषणाबाजीपेक्षा महत्वाचे आहेत, असं ते म्हणाले.
संसदेचे पावित्र्य सत्ताधाऱ्यांनी जपायला हवे. मात्र तसं कृत्य सत्ताधाऱ्यांकडून होताना दिसत नसल्याचंही त्यांनी म्हटलं.
दरम्यान, याआधीही राष्ट्रवादीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी संसदेत धार्मिक घोषणाबाजी नको, अशी भूमिका घेतली होती.
महत्वाच्या बातम्या
-विधानपरिषदेला मिळाल्या पहिल्या महिला उपसभापती; नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड
-94 टक्के पडूनही आत्महत्या केलेल्या मुलाच्या घरी जाऊन खा. संभाजीराजे रडले
-रायगडाला पुन्हा राजधानीचा दर्जा द्या; अमोल कोल्हे यांची गर्जना
-…तर मी आयुष्यात मिशाच काय भुवयाही ठेवणार नाही; उदयनराजे भडकले
-मुख्यमंत्र्यांना वाटतं मी विरोधी पक्षात तर जाणार नाही ना? पण… – एकनाथ खडसे