बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लोकल सुरु करण्याबाबत दानवेंशी चर्चा करण्याची गरज नाही”

नवी दिल्ली | गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल रेल्वे बंद आहे. मात्र आता लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांसाठी 15 तारखेपासून लोकल सुरु करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

ठाकरेंच्या या घोषणेनंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लोकलने प्रवासास परवानगी देण्यापूर्वी रेल्वेशी चर्चा कराला हवी होती, असं म्हटलं होतं. दानवेंच्या या वक्तव्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता दानवेंवर पलटवार केला आहे. लोकल सुरु करण्याबाबत दानवेंशी चर्चा करण्याची गरज नाही, असं राऊतांनी म्हटलं आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत आहे. तसेच आता लोकलसाठी कोणाशी चर्चा करायची? चर्चाच करायची झाली तर आम्ही ती कॅबीनेट मंत्र्यांशी करु. दानवेंशी चर्चा करायची गरज नाही.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी लोकल सुरु करण्याबाबत घोषणा केल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील ठाकरे सरकारवर घणाघात केला आहे. झुकती है दुनिया बस झुकानेवाला चाहिए, असं म्हणत राणेंनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

थोडक्यात बातम्या –

दिल्लीत खलबतं सुरुच; देवेंद्र फडणवीस पुन्हा अमित शहांच्या भेटीला

आरोग्य विभागात नोकरीची सुवर्णसंधी; ‘इतक्या’ हजार पदांसाठी भरती, वाचा सविस्तर

मुख्यमंत्र्यांनी बोलवली टास्क फोर्सची बैठक; आज ‘हे’ मोठे निर्णय घेण्याची शक्यता

राज कुंद्राच्या अटकेनंतरही शिल्पाच्या बहिणीची बिग बाॅसमध्ये एंट्री, पाहा व्हिडीओ!

“पंतप्रधान मोदी तुम्ही सभागृहात या अन् हिम्मत असेल तर चर्चा करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More