बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! गेल्या 24 तासात राजधानी दिल्लीत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही

नवी दिल्ली | कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच दिल्लीतून एक दिलासादायक बातमी आली आहे. गेल्या 24 तासांत राजधानीत कोरोनाचा कोणताही नवीन रुग्ण आढळलेला नाही.

पहिल्या तीन दिवसांत दिल्लीत 16 जणांना कोरोनाची लागण झाली होती. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तुटलेली पाहायला मिळाली. मात्र असं असलं तरी अद्यापही कोरोनाचा संक्रमणाचा धोका कायम आहे.

राजधानी दिल्लीत आतापर्यंत 30 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 20 मार्च ते 22 मार्च या तीन दिवसात 16 रुग्णांची नोंद झाली. यातील 5 रुग्णांची तब्येत बरी झाली असून त्यांना घरी सोडण्यात आलंय.

दरम्यान, सध्या सफदरजंग रुग्णालयात 11 रूग्ण दाखल आहेत. लोकनायक रुग्णालयात 6, राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 5 आणि जीटीबीमध्ये एक रुग्ण दाखल आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

महाराष्ट्रातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याने कोरोनाविरोधातील लढाई जिंकली

मध्य प्रदेशात सत्तापालट; शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्रिपदी विराजमान

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्राला दुसरं मोठं यश; मुंबईतील 12 रुग्ण कोरोनामुक्त

कोरोनाग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी दिलं तीन महिन्यांचं वेतन

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या शंभरीपार; पुण्यात आणखी 3 रुग्ण पॉझिटिव्ह

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More